The Sky! The Evening!
It's evening. The sun is looking so beautiful. Light orange yellow color. Maroon pink mixed in. They are thrown around the sides like something. Thrown far far away acros the distance. Then they were absorbed in the light blue color that is becoming smoky, fade. Without knowing it, the brighter sun is moving downwards. It's sinking. The remained light yellow, orange red colors are reminding the existence of that sunk sun.
And they as well are slowly fading into the blue shade of that sky. Pretty damn cute, beautiful, and the moment that comes with a light wave of contentment.
As if the beauty of nature has suddenly been found to be like wealth.
The sky is always ready to play and put make up on with different shades. His pale blue gray shade has a light pink hue that does feel as if Shri Krishna is present there. These clouds make me feel like the chubby cheeks of Sri Krishna!!
The Flavor of marathi ☺️
संध्याकाळ होत आलीय. सूर्य इतका सुंदर दिसतोय. हलका केशरी पिवळसर रंग. मध्ये मिसळलेला तांबूस गुलाबी रंग. ते चहू बाजूंनी फेकलेत जणू काही. दूरदूरपर्यंत फेकलेत. मग धुरकट होत होत होत होत हलका निळा रंग त्यांनी त्यात सामावून घेतलाय. खूप नकळत अलगद च तो खाली खाली सरकत आहे. डुबत आहे.
त्याच्या अस्तित्वाची जाणीव ते उरलेले फिकट हलके तांबडे, पिवळसर रंग करून देत आहेत. आणि ते सुद्धा हळूच त्या आभाळाच्या निळ्या रंगात विरून जात आहेत. खूपच मोहक, सुंदर, आणि मनावर समाधानाचे हलके तरंग पसरवणारे अलगद मिळालेले क्षण. जसे कि निसर्गाची शोभा अचानक धनलाभासारखी सापडली आहे.
आभाळ वेगवेगळ्या छटांनी नेहमीच नटून बसायला तयार असते. त्याच्या धूसर निळ्या रंगावर हलकी गुलाबी छटा आली ना कि असं वाटतं कि जणू श्री कृष्णा ने च तिथे थाट घातला आहे. श्री कृष्णाच्या गुबगुबीत गालासारखे ते ढग मला भासतात!!